
भोस्ते घाटात कंटेनर- कार अपघातात चौघे जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शनिवारी सायंकाळच्या सुमारास कंटेनर व कार यांच्यात झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली.
दोन्ही वाहने गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. एम.एच. 46 एच. 5774 क्रमांकाच्या कंटेनरने एम.एच. 04 एल.एम. 3968 क्रमांकाच्या कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला असून चौघेजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघाताचे वृत्त कळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, विलास पाटणे व सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी पोहावून मदतकार्य केले.