२४ लाखांची ऑनलाईन फसवणूक, संशयित उत्तरप्रदेशचा?
खेड : शहरातील एकविरानगर येथील एका तरूणास २४ लाख ८५ हजार रूपयांचा गंडा घालणाऱ्या संशयिताचा पोलिसांना सुगावा लागल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे. हा संशयित उदयपूर-उत्तरप्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकामार्फत त्याला ताब्यात घेण्यासाठी लवकरच एक पथक रवाना होणार असल्याचे समजते.
शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक न करता एका कंपनीत गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत अज्ञाताने विक्रांत विजय दांडेकर या तरूणास तब्बल २४ लाख ८५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. या बाबत पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत गंडा घालणाऱ्या संशयिताचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार तो उदयपूरचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. २४ लाखांचा गंडा घालणाऱ्या संशयितास जेरबंद करण्यात लवकरच यश येईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.