
नाचणे शाळेतील मुलांचा प्रवेश चक्क घोडागाडीतून….
रत्नागिरी : नाचणे नं.१ शाळेतील मुलांचा शाळा प्रवेश चक्क घोडागाडीतून झाला.यावेळी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणविस्तार अधिकारी मान.प्रा.सुधाकर मुरकुटे, लेखा अधीक्षक मान.नागवेकर मान.कोतवडेकर, अनुप्रीता आठल्ये,दीपक नागवेकर,अश्विनी पाटील,शरदिनी मुळ्ये, विनोदीनी कडवईकर उपस्थित होते.
मुलांचा वाजतगाजत घोडा गाडीतून प्रवेश करण्यात आला.पहीलितील मुलांचे पाऊल उमटून तसेच फुले उधळून स्वागत करण्यात आले.
मुलांसाठी खास सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता.
या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.