जानवळे येथे गळफासाने तरुणाची आत्महत्या
गुहागर : तालुक्यातील जानवळे येथे ३७ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ११ ते १२ जूनदरम्यान घडली. जावेद फाकीर वनू असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. जावेद हा त्याच्या घराशेजारी असणाऱ्या जुन्या घरात ११ रोजी रात्री झोपायला गेला होता. १२ रोजी सकाळी १०च्या सुमारास त्याचा पुतण्या फरहान आदिल वनू हा त्याची गाडी घेण्यासाठी गेला असता त्याला जावेदंच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे फरहानने दरबाजातून डोकावले असता जावेद हा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. या प्रकरणी गुहागर पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.