
बांधकाम साहित्याची चोरी; दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल
खेड : अजय श्रीरंग माने. रा. खेड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणी कौस्तुभ हिराचंद बुटाला, वय ४८ रा. खेड यांनी तक्रार दाखल केली आहे. वेरळ येथे फिर्यादी यांचे स्टील, शहरींग प्लेटा, कॉम्पेक्टर स्लॅश व्हायब्रेटर मशीन व बांधकामासाठी लागणारे साहित्य (फावडे, कुदळ, घमेली, थापी अशी अवजारे) फिर्यादी यांचेकडे कामाला असलेला सुपरवायद्वार अजय माने (रा- खेड ) यांने ऑगस्ट २०२२ मध्ये त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर घेऊन फिर्यादी यांचे वरील साईडवर येऊन त्यांच्या संमतीशिवाय त्याच्याकडे असलेल्या चावीचा वापर करुन शेडचा दरवाजा उघडला.
शेडमध्ये सणाऱ्या २ लाख. ११ हजार, ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले. त्यामध्ये १ लाख २७ हजार ५०० रूपये किंमतीचे टी.एम.टी. स्टीलचे बार असलेली दीड टन वजनाचे स्टील, २० हजार रूपये किंमतीची कॉम्पेक्टर स्लॅश व्हायब्रेटर मशीन, ६० हजार रूपये किंमतीच्या शट्टरींग प्लेटा, ४ हजार रूपये किंमतीचे बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरून नेले, अशी तक्रार करण्यात आली आहे.