
मजगांव येथे डेंग्यू तापाने डोके वर काढल्याने आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत ची तत्परता
रत्नागिरी : रत्नागिरी पासून जवळच असलेल्या मजगांव येथे डेंग्यू तापाने डोके वर काढले असून ग्रामपंचायत मजगांव चे सरपंच फय्याज भाई मुकादम यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून माहिती दिल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी गांवात प्रत्येक घरात जाऊन रुग्ण तपासणी करीत आहेत . डेंग्यू आजारा बाबत ग्रामस्थांना योग्य माहिती देत आहेत. रुग्णांच्या रक्ताची तपासणी करून खात्री करीत आहेत. आवश्यकतेनुसार उपचार सुरू केले आहेत. डेंगी डासांचा नायनाट करण्यासाठी गांवातील डेंगी नाशक फवारणी करून डेंग्यू आजारा संपविण्या बाबत यशस्वी प्रयत्न करीत आहेत.
या यशस्वी कार्यासाठी मजगांव चे सरपंच फय्याज मुकादम उप. सरपंच शरीफहसन इब्जी, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी पुजारी, चव्हाण, सावंत, शेलार, धोंडे, झोरे , ग्रामीण आरोग्य केंद्र हातखंबा चे कर्मचारी तसेच ग्रामस्थ आदी मेहनत घेत आहेत. सरपंच महाशयांचे कार्य उत्तम असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.