
अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण :चिपळूण – कराड मार्गावरील पोफळी सय्यदवाडी येथे ट्रक चालकाने मद्यपान करुन अपघात केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता घडली. या प्रकरणी शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवाप्पा बसाप्पा मुतेनवार ( ४०, यरगट्टी , बेळगाव ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या घटनेबाबतची फिर्यादी अब्दुल्ला उमर सय्यद ( ४५, रा. पोफळी, सय्यदवाडी चिपळूण ) यांनी दिली आहे. शुक्रवारी दुपारी देवाप्पा बसाप्पा मुतेनवार याने मद्यार्काचे सेवन करुन आपले त्याव्यातील १६ चाकी ट्रक क्र. केए – २२ – ७९९ ७ हा चिपळूण ते कराड रस्त्याने भरधाव वेगात चालवली. शिवाय पोफळी सय्यदवाडी क्र. १ येथील रस्त्याचे डाव्या बाजुस असलेल्या इलेक्ट्रीक पोलला ठोकर दिली. अपघात करुन अपघाताची खबर न देता अपघात ठिकाणाहून निघुन गेला म्हणुन गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.