
“आस्था च्या मुलांनी केले वृक्षारोपण “
रत्नागिरी: शनिवार दि.०८/०६/२०२४ रोजी आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या मुलांनी, आस्थाच्या परकार हॉस्पिटल समोरील जागेत इमारतीच्या दुतर्फा वृक्षारोपण केले.यावेळी संस्थेच्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे यांनी आपण आपल्या मुलांना कशी सृष्टी देणार आहोत? असा प्रश्न पालकांना विचारला. दिवसेंदिवस वाढणारी उष्णता,पाणी टंचाई,अशुद्ध हवा यावर अतिशय परिणामकारक उपाय म्हणजे वृक्षारोपण होय, मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावूया मुलांसोबत झाडांचे पण संगोपन करूया असे सांगितले. या प्रसंगी मुलांचे पालक, मुले, स्थानिक नागरिक, नगर परिषद कर्मचारी आणि आस्थाचे कार्यकर्ते श्री. संकेत चाळके, संपदा कांबळे, शिल्पा गोठणकर, मयुरी जाधव, सुप्रिया कांबळे, मानसी ओर्पे, कल्पेश साखरकर उपस्थित होते.