
चिपळूणच्या व्यवसायिकाची तब्बल पावणेतेरा लाखांची फसवणूक
चिपळूण : तालुक्यातील रेहेळ भागाडी येथे वॉटर पार्कसाठी लागणारे साहित्य पुरवठा करणाऱ्या एका कंपनीने चिपळुणातील एकाची तब्बल १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी रेश्मा मोरे व सचिन उतेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी विजय धनंजय जठार (रा. ओझरवाडी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. विजय जठार यांची ५ जानेवारी ते ५ जून या कालावधीत फसवणूक झाली आहे. जठार यांनी रेहेळ भागाडी येथे वॉटर पार्क बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी एमएस ट्रेण्ड वॉटर राईडस् प्रा. लि. च्या मालक रेश्मा मोरे व व्यवस्थापकीय संचालक सचिन सुदाम उतेकर यांना वॉटर पार्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि वॉटर राईडस् बसविण्यासाठी करार केला होता. ठरलेली रक्कम धनादेश स्वरूपात संबंधित बँक खात्यामध्ये वेळोवेळी पाठविली होती.
मात्र, कंपनीने रेहेळ भागाडी येथील प्रोजेक्टच्या ठिकाणी पाठविलेल्या साहित्यामध्ये दिशाभूल करून जठार यांची १३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.