
जुगार बंद करा असे सांगितल्याच्या रागातून मारहाण
दोघांविरुद्ध गुन्हा ; प्रौढ जखमी
रत्नागिरी ः शहरातील एका बिल्डींगमध्ये जुगाराचा खेळ चालतो तो बंद करावा तेथील लोकांना त्रास होतो. याचा राग मनात धरुन दगडाने व लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश कृष्णा तोडणकर व पराग कृष्णा तोडणकर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. ५) रात्री सव्वा अकराच्या सुमारास फाळके बिल्डींग विठ्ठल मंदिर समोरील रस्त्यावर रत्नागिरी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मिलींद सत्यवान देवरुखकर (वय ४०, रा. फाळके बिल्डींग, रत्नागिरी) हे रहात असलेल्या बिल्डींगमध्ये पहिल्या मजल्यावर सतिष भणसारी हे पत्यांचा जुगाराचा खेळ खेळतात. याचा त्रास देवरुखकर यांना होतो. म्हणून चार दिवसापुर्वी सतिश भणसारी यांना भेटून तू पत्यांचा जुगाराचा खेळ चालवितोस तो बंद कर असे सांगितले. हे फिर्यादी देवरुखकर यांच्या ओळखीचे संशयित राजेश व पराग यांना समजल्याने बुधवारी सायंकाळी सात वाजता फिर्यादी यांच्याकडे जाऊन तुम्ही भणसारी यांना दम दिला का असे बोलून निघून गेले. त्यानंतर रात्री अकरावाजा मिलींद देवरुखकर फ्रेंडस हॉटेल-बाजारपेठ येथे गेले असता संशयितांनी तेथे जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर देवरुखर तेथून चालत येऊन घरी बसले असताना संशयितांनी त्यांची कॉलर पकडून फरफटत घराबाहेर आणले आणले आणि रस्त्यावर शिवीगाळ केली. संशयित राजेश तोडणकर याने दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली तर पराग याने लाथाबुक्यांनी मारहाण करुन दोघेही निघुन गेले. या प्रकरणी फिर्यादी मिलींद देवरुखकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.