
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल
दापोली : सकाळी दूध आणायला अल्पवयीन मुलगी दुकानात गेली असता तिचा विनयभंग केल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. या घटनेने तालुक्यातील मांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत दापोली पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी रोज आपल्या गावातीलच दुकानदाराकडे घरातील जिन्नस आणण्यासाठी जात येत असे. तो दुकानदार सुमारे एक महिना या मुलीची चेष्टा मस्करी करणे किंवा कधी हात पकडणे अशा गोष्टी करत असे. मात्र दुकानदार आपल्यापेक्षा वयाने खूप मोठा असल्यामुळे त्या अल्पवयीन मुलीने फारसे मनावर घेतले नव्हते. मात्र 29 मे रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास सदर पीडित मुलगी त्या दुकानात दूध आणण्यासाठी गेली असता मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे हावभाव करून आणि वर्तन करून पीडित मुलीचा विनयभंग केला. याबाबत ३५४, 354 A (1) (i), ४५२, ५०६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय यादव करत आहेत.