
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संजीवन गुरुकुलच्या बागेमध्ये वृक्षारोपण
रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संजीवन गुरुकुल मध्ये वृक्षारोपण आज दिनांक पाच जून 2024 जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पटवर्धन हायस्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये हरित सेने मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री साळवी सर, पटवर्धन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री कोत्रे सर, तसेच गुरुकुल च्या प्रबंधक सौ. नाईक मॅडम व गुरुकुल मधील सर्व शिक्षक व आठवी आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गुरुकुल चे एक पालक श्री. विनोद प्रभुदेसाई यांनी आपल्या नर्सरीतील आवळा सोनचाफा पेरू पपया आणि बुशमिरी ही झाडे दिली तसेच विद्यार्थ्यांनी तुळस मोगरा अशी अनेक झाडे आणली. गुरुकुलच्या बागेमध्ये ही सर्व झाडे लावण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री साळवी सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.