गुहागरमधील मोबाईल शोरूम फोडी प्रकरणातील चोरटे निघाले झारखंडमधील
गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथील गोविंदा मोबाईल शॉपीमधील 27 लाखाच्या बंपर चोरीमधील चोरटे निघाले झारखंडमधील, गुहागर पोलिसांनी गेले 20 दिवस केलेल्या तपासामध्ये चोरटयांचा पत्ता लागला. मात्र चोरटे हाती लागले नाहीत. परंतु त्यांना सहकार्य करणारा व त्यामध्ये सहभागी असलेला संशयीत म्हणून त्यांच्या भावाला गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांनी दिली.
तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शंगारतळीमधील गोविंदा मोबाईल शापीमधील 27 लाखाचे मोबाईल व 90 हजाराची रोकड चोरी गुहागर पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. गेल्या 20 दिवसात दुकानातील सीसीटीव्ही फुटेजबरोबर चिपळुण बाजारपेठेतील विविध चोऱ्या, चोरी करण्याचा केलेला पयत्न. एका हार्डवेअरमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते मिळून आले. त्यानंतर एस. टी. स्टँड, रेल्वेस्टेशन आदी भागातही त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून अखेर आरोपी नक्की कोण याचा शोध लावण्यात त्यांना यश आले आहे. या तपासामध्ये झारखंड येथे पोहचून त्या चोरांचे घर गाठले. मात्र या चोरीमध्ये सहभागी असल्याचा संशय धरून त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे.