
रत्नागिरी – सिंधुदुर्गात नारायण राणे विजयी
रत्नागिरी:- रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात नारायण राणे यांनी ४७ हजार ८५८ मतांचे मताधिक्य घेत विरोधी उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. मतमोजणीची एखाद दुसरी फेरी वगळल्यास मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत नारायण राणे यांनी मताधिक्य घेतले. ईव्हीएम मशीन मतमोजणीत नारायण राणे यांना ४ लाख ४५ हजार ३३९ तर विनायक राऊत यांना ३ लाख ९६ हजार ५२४ इतकी मते पडली. तर पोस्टल मतदानाच्या मतमोजणीत नारायण राणे यांना ३ हजार १७५ तर विनायक राऊत यांना ४ हजार १३२ मते पडली. अंतिम निकालात नारायण राणे यांना ४ लाख ४८ हजार ५१४ तर विनायक राऊत यांना ४ लाख ६५६ इतकी मते मिळाली. ४७ हजार ८५८ मते घेत नारायण राणे यांनी बाजी मारली.