Monday October 5, 2026

रत्नागिरी :रत्नागिरी रत्नागिरी येथील राजीव रविंद्र सप्रे यांनी यंदा हस्तकौशल्यातून श्रींची मूर्ती आणि रत्नागिरीतील सुप्रसिद्ध अशा श्री झरीविनायक मंदिर, भाट्ये, रत्नागिरीचा देखावा साकारला आहे. रत्नागिरीतील पर्यटनाच्या दृष्टीने श्री झरीविनायक मंदिराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यत व पर्यटकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न सप्रे यांनी केला आहे.

मारुती मंदिर येथील दामले विद्यालयाशेजारील रत्नदिप अपार्टमेंट येथे श्री. सप्रे राहतात. गेल्या 13 वर्षापासून सप्रे हाती गणेश मूर्ती आणि देखावा साकारत आहेत. यापूर्वी शहरातील मारूती मंदिर सर्कलचा देखावा, मांडवी येथील गेट वे ऑफ रत्नागिरीचा देखावा, रत्नागिरीतील थिबा राजवाड्याची प्रतिकृती देखील त्यांनी साकारली होती. श्री झरीविनायक मंदिराच्या देखाव्यासाठी कागद, पुठ्ठा अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. हा देखावा साकारण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागला, अशी माहिती सप्रे यांनी दिली. दिनांक 29 सप्टेंबर पर्यत त्यांच्याकडे बाप्पा असून देखावा पाहता येईल,असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!