Sunday July 5, 2026


रत्नागिरी :पावसाने शनिवार रात्रीपासून चांगलाच जोर घेतला आहे. रविवारी पहाटेपासून पावसाची संततधार जिल्हाभर सुरू आहे. रविवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंतच्या २४ तासात पावसाने सर्व तालुक्यांमध्ये दमदार पडण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ४७३ मिलिमीटर (सरासरी – ५३ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.

पावसाने जुलै महिना सुरू होताच अधिक जोर घेतला आहे. रविवारी – पहाटेपासून पावसाने संततधार धरली आहे. मंडणगड, गुहागर आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांत मध्यम – पाऊस पडला आहे. मात्र, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या सहा तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस – लांजा आणि चिपळूण तालुक्यात झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.

खेडमधील जगबुडी नदीची पातळी तीन दिवसांपासून इशारा पातळीवर आहे. मात्र, वाशिष्ठी (चिपळूण), शास्त्री, सोनवी, काजळी (संगमेश्वर), – कोदवली (राजापूर), मुचकुंदी (लांजा) आणि बावनदी (रत्नागिरी) या नद्यांचे पात्र अद्याप कोरडे आहे. जून महिन्यात पावसाने निराशा केली असली तरी आता जुलै महिन्याचा कोटा पाऊस पूर्ण करेल, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!