देव, घैसास, कीर महाविद्यालयात मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन
रत्नागिरी: भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील श्वेता चव्हाण, देवश्री शिंदे यांनी विद्यार्थ्याना मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा, समाजाच्या संपर्कात रहा, ध्यानधारणा करा, मद्य आणि उत्तेजक पदार्थ टाळा, नविन कौशल्य शिका, डिजिटल मिडिया व टिव्ही इत्यादींचा उपयोग कमी करा, मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी इतर लोकांशी कनेक्ट रहा, शारिरीकदृष्ट्या सक्रीय व्हा, नविन गोष्टी शिका, इतरांना काहीतरी घायला शिका, वर्तमान क्षणाकडे लक्ष द्या ही पंचसूत्री सांगितली. तसेच शासकीय रुग्णालयामध्ये नव्याने सुरु झालेल्या जिल्हा आरोग्य कार्यक्रम व त्यांच्या विभागाचा संपर्क क्रमांक याविषयी माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव व राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सौ. ऋतुजा भोवड, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपिका मयेकर यांनी केले. प्रा.मिथिला वाडेकर यांनी आभार मानले.