सैतवडे येथील नगमा नदीम खान विशेष कार्यकारी अधिकारी
रत्नागिरी :सैतवडे येथील श्रीमती नगमा नदीम खान यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सैतवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते नदीम खान यांच्या पत्नी श्रीमती नगमा खान यांची मा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नामुळे विशेष कार्यकारी आधिकारी या पदावर निवड झाली आहे. तसेच शिवसेना गट वाटदचे उपविभाग प्रमुख अजिम चिकटे यांच्या विशेष प्रयत्नामुळे सैतवडे गावात आता विशेष कार्यकारी अधिकारी पद आल्यामुळे ग्रामस्थांची खुप सोय होणार आहे. तरी आपण या पदाचे मान राखुन खुप चांगले काम करु अशी खात्री श्रीमती नगमा खान यानी दिली आहे. सैतवडे गावातील विशेष कार्यकारी या पदावर नियुक्ती झाल्यामुळे श्रीमती नगमा खान यांचे परिसरातून कौतुक होत आहे.