
खेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा
खेड :शहरातील बाजारपेठ तीनबत्ती नाका येथे निर्जन इमारतीच्या बाजूस दि. ९ रोजी ५.३० वा. चे सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकाला अटक केली आहे.
प्रकाश राजेंद्र पवार (वय २८ वर्षे) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सिद्धार्थ मनोहर दिंडे (वय ४८) हा कल्याण पेपरमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या शुभ अंकावर पैसे लावून मटका- जुगाराचा खेळ खेळवीत असताना पोलिसांना रंगेहाथ आढळून आला व त्याच्याकडून एकूण २ हजार ५२ रोख रक्कम व इतर जुगार साहित्य सापडले. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.