
रत्नागिरीत सीएनजी पंपावर गॅसचा तुटवडा, गॅससाठी पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा
रत्नागिरी: शहरात सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात सीएनजीचे तीन पंप असून यापैकी दोन पंपावर गॅसचा प्रचंड तुटवडा असल्याने गॅस भरण्यासाठी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.
सीएनजी गॅस तुटवड्यामुळे रत्नागिरी शहरातील रिक्षा चालकांची फार अडचण होत आहे. कमी प्रमाणात गॅस असल्याने वाहन चालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. रिक्षा चालकांना बराचवेळ रांगेत राहावे लागत असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक चालकांचे फार मोठे नुकसान होत आहे. मागील काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा भासत आहे त्यावर त्वरित उपाययोजना करावी असे रत्नागिरी शहरातील रिक्षा चालकांची मांगणी आहे.
