
रेल्वे स्थानकात समोरील बॅरिकेट्सवर दुचाकी आदळून तरुण ठार
रत्नागिरी : रेल्वे स्थानकासमोर शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी घेऊन येणाऱ्या तरुण स्वाराची रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील बरिकेट्सवर धडकल्याने अपघात झाला.
सम्राट देसाई ( रा. थिबा पॅलेस रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दुचाकीने येणाऱ्या सम्राट देसाई याची गाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील बॅरिकेड्सवर धडकली. अपघातानंतर दुचाकीवरील सम्राट देसाई घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत सुमारे वीस मिनिटे पडून होता. मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागली. या गाडीने जाणाऱ्या प्रवाशांची फलाटावर जाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोरील मुख्य प्रवेशद्वारावर जिथे वाहने आत येऊ नयेत, यासाठी लोखंडी अडथळे लावण्यात आले आहेत नेमक्या याच अडथळ्यांवर एका तरुणाची दुचाकी धडकली आणि त्यावरील तरुण कोसळला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटानंतर लोकांची गर्दी जमल्यावर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.