
प्रभाग क्रमांक ५ च्या शिवसेना शाखाप्रमुख पदी अविनाश अशोक भोसले यांची निवड
पालकमंत्री उदय सामंत यांनी अविनाश भोसले यांचा केला सत्कार
रत्नागिरी :नगर परिषद प्रभाग क्रमांक ५ च्या शिवसेना शाखाप्रमुख पदी अविनाश अशोक भोसले यांची निवड करण्यात आल्याची घोषणा शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री,रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत व किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. शाखा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन करून पक्षाच्या कामासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अविनाश भोसले एक युवा नेतृत्व असून साळवी स्टॉप परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांचा नेहमी सहभाग असतो. अविनाश भोसले यांच्या कामाची दखल घेत शिवसेना शिंदे गटाने त्यांच्यावर प्रभाग क्रमांक पाचच्या शाखा प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
नुकतीच अविनाश भोसले यांच्यावर ही नियुक्ती सोपवण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, उपजिल्हाप्रमुख राजन शेटे, जिल्हा कार्यालय प्रमुख पपू सुर्वे, महिला शहर प्रमुख स्मितलं पावसकर, शहर संघटक सौरभ मलुष्टे, विभाग प्रमुख दीपक पवार, मनोज साळवी, महिला शहर संघटक पूजा पवार, उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर व इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.