
नवे वर्ष लग्नाळूंसाठी घेऊन येणार अनेक मुहूर्त
रत्नागिरी :यंदा लग्नाळूंसाठी 2023 च्या सरत्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये भरपूर शुभ दिवस असून 2024 सालातही शहनाई वाजण्यासाठी अनेक मुहूर्त असल्याचे पंचांगामध्ये वर्तविण्यात आले आहे. डिसेंबर 2023 मध्ये सलग पाच दिवस आणि 9 डिसेंबर मुहूर्त आहेत. त्यानंतर 11 डिसेंबर, 15 डिसेंबरला चांगला मुहूर्त असल्याचा पंचांगामध्ये उल्लेख आहे. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यावर लग्नाचे वेध लागतात. यंदा पुष्कळ लग्न तिथी असल्याने लग्नाचे बार उडत आहेत.
घरात लग्न म्हटले की दोन्हीकडील घरात उत्साहाचे वातावरण असते. हॉल बुकिंगसह पै- पाहुणे, मित्रमंडळींना निमंत्रण देण्यासाठी नावांची यादी फायनल करण्याची घाई सुरू असते. जेवणातील मेनू, कपडे, व्हिडीओ शूटिंग, वाजंत्री, घोडा, भटजी, लग्न धामधुमीत की कमी माणसांत करायचे, प्री-वेडिंग शूट करायचे की नाही, अशा अनेक विषयांसाठी धावपळ सुरू असते. हे चित्र सध्या शहरात सर्वत्र दिसून येत आहे.
- 2024 मधील लग्नाचे मुहूर्त
जानेवारी- 16, 17, 20, 21, 22, 27, 28, 30, 31. फेब्रुवारी- फेब्रुवारी महिना हा विवाहासाठी एक आदर्श काळ मानला जातो. चांगली गोष्ट म्हणजे या महिन्यात लग्नासाठी अनेक शुभमुहूर्त आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार 4, 6, 7, 8, 12, 13, 17, 24, 25, 26 आणि 29 फेब्रुवारी 2024 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत. मार्च – 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12. एप्रिल- 18, 19, 20, 21 आणि 22. मे 2024 मध्ये लग्नासाठी कोणताही शुभ मुहूर्त नाही. जून 2024 मध्येही लग्नासाठी शुभमुहूर्त नाही. जुलै – 9, 11, 12, 13, 14 आणि 15ऑगस्ट व सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये लग्नासाठी कोणताही अनुकूल किंवा शुभ काळ नाही. नोव्हेंबर – 12, 13, 16, 17, 18, 22, 23, 25, 26, 28 आणि 29 . डिसेंबर- 4, 5, 9, 10, 11, 14, 15असे मुहूर्त आहेत.