
गवत मारण्याचे औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील कोठारवाडी-कोळीसरे येथील प्रौढाला खोकला लागल्याने चुकून घरात सोड्याच्या बाटलीत ठेवलेले गवत मारण्याची औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. केशव दामोदर चौगुले (वय ३९, रा. कोठारवाडी-कोळीसरे, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केशव चौगुले यांना खोकला लागला होता. चुकून त्यांनी घरात सोड्याच्या बाटलीत ठेवलेले गवत मारण्याचे औषध प्राशन केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.