
ध्वजदिनानिमित्त गुरुवारी होणार शौर्यपदकधारकांचा सन्मान
रत्नागिरी:- सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदकधारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ येथील अल्पबचत सभागृह येथे गुरुवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. सूर्यवंशी यांनी केले आहे.