
खेडमध्ये विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
खेड, : शहरातील नाना- नानी पार्क लगतच्या शेतात असलेल्या विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.
काजीम झाकीर पलनाक (रा. पटेल मोहल्ला) तरुणाचे नाव आहे. शनिवारी (ता. २) दुपारचे जेवण करून मित्राकडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. रविवारी (ता. ३) सकाळी विहिरीत तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला.