
महावितरणच्या साहित्याची चोरी
खेड : महावितरणच्या चिंचवली-शिगारवाडी येथे ठेवलेले २ नादुरुस्त रोहित्रामधील वायर व ऑईल असा सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २९ नोव्हेंबरला उघडकीस आली.
या प्रकरणी साईनाथ मनोहर कांबळे (वय ४४, रा. भरणे) यांनी तक्रार दिली. चिंचवली- शिगारवाडी येथे साईटवर ठेवण्यात आलेले रोहित्र चोरट्याने उलटे करून त्यामधील कॉपर कॉईल व ऑईल असा ३० हजारांचा ऐवज पळवला आहे.