
काडवली नदीपात्रात वृद्धाचा मृतदेह
खेड : तालुक्यातील काडवली-काजवेवाडी येथील नदीपात्रात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता वृद्धाचा मृतदेह आढळला. विष्णू अर्जुन पवार (वय ६३, रा. मळे, सातारा) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
काडवली- काजवेवाडी नदीपात्रात शेरणीच्या झाडाला अडकलेल्या स्थितीत मृतदेह ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. सर्वत्र दुर्गंधीही पसरली होती. याबाबत ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात कळवल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.