
मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी
रत्नागिरी: मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रत्नागिरीतील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अनेक पदाधिकारी व सदस्य पत्रकार उपस्थित होते.
विविध घटनांचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचे देखील आरोग्य चांगले राहावे यासाठी मराठी पत्रकार परिषद राज्यबरोबर रत्नागिरीतील आरोग्य शिबीर घेण्यात आले . रत्नागिरीतर्फे शहरातील चिरायू हॉस्पिटल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी पत्रकारांचे विविध आरोग्य तपासण्या चिरायू हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. तसेच आरोग्य विषयी खबरदारी घेण्याविषयी मार्गदर्शनही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केली. विशेषतः चिरायूचे डॉक्टर आनंद फडके आणि हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची चांगली मदत झाली. नेटक्या नियोजनामुळे शिबीर यशस्वी झाले.
यावेळी आनंद तापेकर, हेमंत वंणजु , राजेश शेळके ,जमीर खलफे, मुश्ताक खान,शकील गवाणकर,जान्हवी पाटील, सतीश पालकर, रहीम दलाल,केतन पिलणकर आदी सदस्य उपस्थित होते.