
कोरे मार्गावर आज अडीच तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मडुरे ते माजोर्डा या विभागातील रेल्वे रूळ तसेच इतर देखभालीच्या कामांसाठी 4 डिसेंबर रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तीन गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. कोकण रेल्वेने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
गाडी क्र. 17310 वास्को द गामा – यशवंतपूर जंक्शन एक्स्प्रेस गाडीचा 4 रोजी सुरू होणार्या प्रवासाच्या वेळापत्रकात बदल केला असून ही गाडी नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिरा म्हणजे 23.25 वा. वास्को द गामा येथून सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
कोकण रेल्वेने म्हटले आहेकी, मडुरे माजोर्डा या ठिकाणांमध्ये सोमवारी, 5 डिसेंबर रोजी 21.25 ते 23.55 या वेळेत 2.30 तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी)- तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसचा 4 रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी – सावंतवाडी रोड विभागादरम्यान अडीच तासांसाठी नियमित केला जाणार आहे. गाडी क्र. 12619 लोकमान्य टिळक (टी) मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा 4 रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी – कुडाळ विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.