
अभिनेते प्रशांत दामले यांचा रत्नागिरीत नागरी सत्कार
रत्नागिरी : अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले नाट्यप्रयोगासाठी रत्नागिरीत येत आहेत. अध्यक्ष झाल्यानंतर ते प्रथमच रत्नागिरीत येणार असल्याने त्यांचा अखिल भारतीय नाट्य परिषेच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
रविवारी (ता. ३) सायंकाळी ६.३० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत साहेब यांच्या हस्ते दामले यांचा सत्कार होणार आहे. हा कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेच्या सदस्यांनी आणि रत्नागिरीकर रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखा कार्याध्यक्ष तथा मध्यवर्ती शाखेचे सहकार्यवाह समीर इंदुलकर यांनी केले आहे.