
उडवीवरुन पडून प्रौढाला दुखापत
रत्नागिरी ः तळवट (ता. खेड) येथील प्रौढ उडवी रचत असताना खाली उतरताना पडून जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. संतोष तुकाराम पवार (वय ४०, रा. तळवट, ता. खेड) असे जखमी प्रौढाचे नाव आहे. ही घटना तळवट येथे बुधवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवार बुधवारी सायंकाळी भाताची उडवी घालत होते. उडवी घालताना त्याला शिडी लावली होती. ती शिडी ते उतरत असताना सरकली व ते पडून जखमी झाले. तत्काळ उपचारासाठी कामथे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.