
महाविकास आघाडीला रत्नागिरीत जोर का धक्का
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिरगांव गावच्या सरपंच फरीदा काझी यांचा होणार उद्या शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी: तालुक्यातील शिरगांव ग्रामपंचायतच्या महाविकास आघाडीचे विद्यमान सरपंच फरीदा रज्जाक काझी यांचा महाविद्यालय आघाडीला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यामुळे रत्नागिरीच्या महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहेत. या प्रवेशामुळे रत्नागिरीच्या महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे.
माजी सरपंच रज्जाक काझी यांच्या पत्नी फरीदा काझी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडून लढवून निवडून आल्या होत्या. मात्र गावाच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.