अनोळखी मनोरुग्ण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल
रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे अनोळखी मानसिक रुग्णाला. येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनोळखी मानसिक रुग्ण कोचीवली एक्स्प्रेस गाडीने प्रवास करत असताना रेल्वे पोलिसांना सापडला.
या बाबत रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्या अनोळखी रुग्णास प्रथम मनोरुग्णालय व अधिक उपचारासाठी त्याला मंगळवारी (ता. २८) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे अंदाजे वय ४२ असून तो झिमी थॉमस असे नाव सांगतो तसेच केरळचा असल्याचे सांगत आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.