
भुसेवाडी येथे पोलिसांची गावठी दारु विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः भुसेवाडी (ता. संगमेश्वर) येथे विनापरवाना हातभट्टीच्या दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५६० रुपयांची १० लिटर दारु पोलिसांनी जप्त केली असून संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक केशव महाडिक असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २७) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास भुसेवाडी येथील झाडी झुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महाडिक हा विनापरवाना हातभट्टीची गावठी दारु विक्री करत असताना सापडला. त्याच्याकडून ५६० रुपयांची १० लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.