
धडक कारवाईत ११० किलो प्लास्टिक जप्त
देवरुख नगरपंचायतीच्या पथकाची कारवाई
संगमेश्वर : शासनाकडून पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेल्या सर्व वस्तूंवर बंदी घातली गेली आहे. देवरूख नगरपंचायतीच्या पथकाने या कायद्यांतर्गत आज बाजारपेठेत कारवाई करून ११० किलोग्रॅम प्लास्टिक वस्तू जप्त केल्या.
सिंगल यूज प्लास्टिकच्या कचऱ्यापासून होणारे प्रक्षण कमी करण्यासाठी शासनाकडून ही ठोस पावले उचलली गेली आहेत. सिंगल युज प्लास्टिक वस्तूंची विक्री, वापर, हाताळणी तसेच साठवणूक करण्यावर महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंबाबतच्या (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा) अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी शहरात करण्याबाबत नगरपंचायतीकडून वेळोवेळी नागरिकांना सूचना दिल्या होत्या. पथकाने पोलिसांच्या सहकायनि शहरातील बाजारपेठेत सिंगल युज प्लास्टिक वापर करणाऱ्या व्यापारी व दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईदरम्यान ११० किलोग्रॅम सिंगल युज प्लास्टिक वस्तू जप्त करून ३९ हजाराचा दंड वसूल केला.