
कळबंस्ते बाजारपेठेत लाखाची घरफोडी
चिपळूण : तालुक्यातील कळबंस्ते बाजारपेठेतील घरफोडी करून ९२ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यान चोरून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार विकास शहाजी लादे (५१, कळंबस्ते) यांनी दिली आहे. २० ते २३ नोहेंबर या कालावधीत ते कामानिमित्त बाहेर गेले होते.
घर बंद असताना मुख्य दरवाजा व बेडचा दरवाजा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले २४ ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले. ९२ हजार ५०० रूपये इतकी या दागिन्याची किंमत आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वंदना कनोजा या करीत आहेत.