
पोमेंडी रेल्वे ट्रॅकवर अनोळखी मृतदेह आढळला
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पोंमेडी येथील ट्रॅकवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली.
पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २४) दुपारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ३५ ते ४० आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.