
गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड:- तालुक्यातील फुरुस फलसोंडा येथील घराच्या परड्यात चुलीवर पाणी गरम करताना अचानक आगीचा भडका होऊन गंभीररित्या भाजलेल्या मुनिरा दिलेर परकार या ५६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १७ जुलै २०२३ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता घडली होती.
घटनेनंतर त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कळंबणी या ठिकाणी प्राथमिक उपचार करुन त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटल व तेथून १८ ऑगस्ट रोजी सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, २६ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत २१ नोव्हेंबर रोजी खेड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.