
दापोली येथील विवाहितेचा आकस्मित मृत्यू
रत्नागिरी:- दापोली येथील विवाहितेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
ही घटना रविवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वा. घडली. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेखा शिवा वाघमारे (३५, रा. वेळवी दापोली, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत तिच्या पतीने खबर दिली आहे. त्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून सुरेखा यांना अशक्तपणा आणि दम्याचा आजार असल्याने तिच्यावर घरगुती आयुर्वेदिक उपचार सुरु होते. परंतु, गेले दोन दिवस तिचा आजार वाढल्याने तिला दापोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले असता तिथे उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.