
दुचाकीस्वाराला धडक, टेम्पो चालकावर गुन्हा
खेड : तालुक्यातील खोपी-कुंभाड मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅम्पोचालक शुभम संतोष घोरपडे (रा. हुंबरवाडी, मिलें) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजेंद्र जानू तांबे यांनी तक्रार दाखल केली. या अपघातात अंकित अनिल तांबे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा सहकारी रुपेश सावंत जखमी झाला आहे. अंकित तांबे हा दुचाकीने जात असताना टेम्पो चालक शुभम घोरपडे याने समोरून दुचाकीला धडक दिली होती. त्यामध्ये अंकितचा जागीच मृत्यू झाला होता.