
मांडकी खुर्द येथील तरुणाची नदीत उडी घेत आत्महत्या
चिपळूण : तालुक्यातील मांडकी खुर्द येथील २२ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. तेजस मारुती घाणेकर (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे.
मारुती घाणेकर यांनी याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात खबर दिली. तेजस हा दि. ७ नोव्हेंबरपासून घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. अखेर मांडकी कापशी नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या कोणत्या कारणाने केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.