
उद्यापासून कोकणासह गोव्यात पावसाची शक्यता
रत्नागिरी :-पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे किनारपट्टी कोकण प्रदेश आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मुंबई आणि आसपासचे जिल्हे कोकण प्रशासकीय विभागाचा भाग आहेत.
पुण्यातील आयएमडीच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी मंगळवारी सांगितले की, “जोरदार पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे कोकण, गोवा,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. या भागात २३ ते २७ नोव्हेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ते म्हणाले की, २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.