
नुतन कांबळे राज्य गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
जळगाव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात पुरस्कार वितरण
रत्नागिरी :राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्याकडून देण्यात येणारा राज्यपातळीवरील गुणवंत मुख्याध्यापक, राज्य पुरस्कार हा पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका नुतन नितीन कांबळे यांना जाहीर झाला असून मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या फैजपुर, जळगांव येथे दि.१८ व १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार मुख्याध्यापक संघटनेचे राज्य अध्यक्ष जे.के. पाटिल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून यावेळी अधिवेशन अध्यक्ष विजय पाटील , शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे , महामंडळ गाध्यमिक शाळा मुख्याध्यापक सचिव शांताराम पोखरकर , तसेच
महामंडळाचे सर्व पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघटना सर्व
पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका नुतन कांबळे या गेली ११ वर्षे पाली येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, साई अनिरुध्द एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र सामंत, संस्थेच्या संचालिका स्वरूपा सामंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी उपस्थित राहुन सर्वांना मार्गदर्शन व पुरस्कार प्राप्त
सर्व मुख्याध्यापक यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.