
माहिती अधिकार जिल्हाध्यक्षपदी योगेश पेढांबकर
चिपळूण :निस्वार्थी जनहित बहुद्देशीय संस्था सावली संचलित,माहिती अधिकार संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत चिपळूण तालुक्यातील ज्यांनी अनेक वर्षे माहिती अधिकार जागृत करण्याचे,प्रचार व प्रसार करण्याचे कार्यउत्तमरीत्या करीत ज्यांनी सलग ५ वर्षे कायद्याचा विधायक वापर करीत जिल्ह्यामध्ये माहिती अधिकार कायदा जागृत करण्याचे काम करण्यात आले. याच कार्याची दखल घेत माहिती अधिकार संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.अजय प.तुम्मे यांनी रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी चिपळूणचे सुपुत्र श्री.योगेश तानु पेढांबकर यांना नियुक्त केले असून विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निर्भिड, निःपक्ष व निःस्वार्थी अशी असणारी महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था आहे. राज्य कार्यकारणीच्या राज्यस्तरीय बैठकीत सदर पदाधिकारी शिफारशीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कार्य असल्यानेच श्री.पेढांबकर यांना रत्नागिरी जिल्हयाची एक मोठी जबाबदारी देण्यात आली.
श्री. योगेश पेढांबकर हे एक माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेली ४ वर्षे त्यांनी निर्मल ग्रामपंचायत पेढांबे, येथे तंटामुक्त समिती मध्ये एक विद्यमान सदस्य व एक पत्रकार म्हणून उत्तम कार्य केलेले आहे.व आजही करीत आहेत.एक जबाबदार नागरीक व दक्ष नागरीक म्हणून काम करण्यास केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ हा जनसामान्याचा कायदा आहे.या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी लोकाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. हाच उद्देश आहे असे मत श्री.पेढांबकर यांनी सांगितले. गोरगरीबांसाठी विधायक मार्गाने काम करीत कायद्याचा वापर करीत न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत अनेक लोकांची शासकीय कामे प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत. गरीब व गरजू लोकांसाठी त्यांनी मोफत माहिती देण्याचे कार्य ह्याच संघटनेचे ब्रीदवाक्य असल्याने कायम ठेवले आहे.
या नियुक्तीबद्दल संपूर्ण जिल्हाभरातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.