
पादचार्याला पाठीमागून धडक देत अपघात केल्या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून पादचारी तरुणाला पाठीमागून धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. मुंबई-गोवा महामार्गावरील पाली ते लांजा रस्त्यावर घडली.
भूषण राजेश मठकर (२३, रा. लांजा सुतारवाडी, रत्नागिरी) असे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात नीलेश सिताराम ठोंबरे (वय ३२, रा. साठरेबांबर, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी भूषण मठकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८- एएफ-९४७९) घेऊन पाली ते गोवा जाणाऱ्या रस्त्याने जात होता. त्याच सुमारास नीलेश ठोंबरे हे तिथून चालत जात असताना भूषणचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याने नीलेशला पाठीमागून धडक देत अपघात केला.
या अपघातात नीलेश रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला पाठीमागील बाजूला गंभीर दुखापत होऊन रक्ताची उलटी झाली. याप्रकरणी संशयित भूषण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.