
वणंद बौद्धवाडी येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यू
दापोली : तालुक्यामधील वणंद बौद्धवाडी येथील नंदा धोत्रे या ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. ही घटना घातपात आहे की आत्महत्या? याबाबत दापोली पोलिस तपास करीत आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदा धोत्रे या १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घरून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर भोंजाळी शिवाजीनगर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत मयत स्थितीत आढळून आल्या. त्यांच्या मृत्यू हा आत्महत्या आहे की घातपात आहे, याचा तपास दापोली पोलिस करीत आहेत. याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.