
रत्नागिरीत प्राणी संग्रहालयाच्या कामाला १ डिसेंबरपासून प्रारंभ होणार- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी नजीकच्या आरेवारे येथे होणाऱ्या प्राणी संग्रहालयाच्या कामाला १ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले आहेत.
७५ कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ३ कोटी ८५ लाख रूपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी या प्राणी संग्रहालय उभारणीसंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून प्राणी संग्रहालयाच्या सामंजस्य कराराबाबत लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्राणी संग्रहालयाच्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ३ कोटी ८५ लाख आणि वाॅल कंपाऊंडसाठी ५ कोटी रूपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार असून प्राणी संग्रहालयाच्या वॉल कंपाउंडचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी या बैठकीत दिले.