
पतंजलि परिवारातर्फे नवीन योगशिक्षकाना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी :पतंजलि परिवारातील यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या नवीन योगशिक्षकांना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम नुकताच रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी अध्यात्म मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ओमकार व प्रार्थना म्हणून करण्यात आली. पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी एडवोकेट श्री विद्यानंद जोग यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला पतंजलि चिकित्सालयाचे संचालक व पूर्ण कालिक श्री अमृतलाल पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भारत स्वाभिमान चे जिल्हा संघटन मंत्री श्री विनय साने आणि महिला पतंजलि योग समितीच्या शहर प्रभारी सौ नीता साने यांनी नवीन योगशिक्षकाकडून असलेल्या संघटनेच्या अपेक्षा व्यक्त केल्या व हाती घेतलेल्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. श्री विद्यानंद जोग यांनी नवीन योगकक्षा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले व त्यासाठी पतंजलि योग समिती सर्व ते सहकार्य करेल असे सांगितले.

त्यानंतर उपस्थित खालील योगशिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. १.सौ कृपा पाटील २. सौ आरुषी पाटील 3.सौ नेहा विलणकर 4.सौ साक्षी जंगम 5.श्री साहिल झोरे 6.श्री उमेश शिवगण 7. श्री दिनेश झोरे 8.सौ प्रियांका पाटील 9.सौ.आरोही पंडित
भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी श्री. मारूती अळकुटे यांनी नियमित योग वर्ग कसा चालवावा याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व नवीन योगशिक्षकांनी आपला परिचय करून दिला व योगप्रचार करण्यासाठी कशाप्रकारे काम करणार हे थोडक्यात विशद केले.
पतंजलि योग समितीचे तालुका प्रभारी श्री राजू गोरले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.