कोकण विभागीय पेन्शन अदालतीचे आयोजन
रत्नागिरी :कोकण विभागातील पेन्शन अदालत मंगळवार दि. 21 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे. पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचार्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास या दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शनधारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून आपले प्रश्न उपस्थित करावे, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.